Saturday, May 5, 2018

अपूर्ण भाग 2

 
  -- अपूर्ण भाग 2 --


कुमार तयार होऊन हॉलमध्ये आला. मोती कलरचा झब्बा त्याला छान दिसत होता. सर्व पाहुण्यांना भेटून तो त्यांची विचारपूस करत होता. पण त्याचे लक्ष होते तिच्या वाटेवर... सारखी त्याची नजर जिन्याकडे होती....

"
होतेय, कोकी तयार होतेय " केतकी हळूच त्याच्या कानात बोलली.

"
होऊ दे की मग. मला काय ? "

"
असे का.... सारखे साहेबांचे लक्ष जिन्याकडे आहे म्हणून सांगितले आणि वरतीतर नुसता तुझ्या नावाचा जप चाललाय. सगळे नुसते कुमार.... कुमार.... "

"
सगळे ? " कुमारने केटकीकडे बघत विचारले .

"
कोकी सुद्धा " हसत केतकी बोलली.

-------------------

जांभळ्या कलरच्या घागरा आणि चोळीमध्ये अमृता खरंच सुंदर दिसत होतीकुमार हॉलमध्ये कोठेपण असला तरी त्याचे लक्ष फक्त अमृतकडेच होते.

चोरून त्याने तिच्या भरपूर छबी कॅमेरामध्ये टिपून घेतल्या.

श्रीमंतपूजन झाल्यावर मस्त गाण्याच्या भेंड्या रंगल्या होत्या........ आज काय माहीत अमृता आणि कुमारच्या तोंडातून फक्त रोमँटिक गाणी निघत होती.. आणि प्रत्येक गाण्याच्या वेळी त्याचे लक्ष एकमेकांकडेच होते.

केतकीने हळूच दिप्तीला डिवचले आणि खुणेनेच दोघांकडे बघ म्हणून सांगितले... दिप्तीच्यापण लक्षात सगळं आले. तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने केतकीला डोळा मारला...

-----------

भेंड्या संपल्यावर दिप्तीने कुमारला स्टेजवर बोलावले.

"
काय चाललय तुझे कुमार.. मघापासून बघतेय मी "

"
काय कोठे... काही नाही " कुमार चपापुन बोलेला.

"
नाही काय.. सारखे अमूकडे बघत असतोस "

"
नाही .. तू समजते तसे काही नाही "

"
नाही काय.. मी काय दूधखुळी आहे.... तिला कांही बोलला नाहीस ना "

"
नाही " खाली मॅन घालून कुमार बोलला.

"
अरे मग खुळ्या कधी बोलणार... " हसत दीप्ती बोलली.

"
किती घाबरवलं तू मला "

"
अरे, अमू आवडेल मला वहिनी म्हणून. पण तिला कल्पना दे की मी सांगू ? "

"
नको मी बोलतो तिच्याशी.... Thanks for understanding...  "

वेळ करू नको "

---------------------------------------

रात्री सगळे झोपायला गेले. कुमार अजून स्टेजवर नवरा नवरीच्या खुर्चीत बसून होता.

"
कसला विचार करतो आहेस. झोपणार नाहीस " अमृता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शेजारील खुर्चीत बसत बोलली.

"
सहज बसलो होतो.. "

"
कसला विचार चाललाय ? "

खाली बघत कुमार शांत बसला.

"
बोल रे, काय झाले ? "

"
कसे बोलू समजत नाही "

"
सांग, आपण आता बेस्ट फ्रँड आहोत ना "

"
हम्म.. " तिच्या डोळ्यात बघत तो पुढे म्हणला " मला वाटतंय की...... "

"
काय ? "

"
मी प्रेमात पडलोय.... "

"
मस्त.... कोणाच्या ? " उत्साहीत होत अमृताने विचारले.

"
माझ्या बेस्ट फ्रँडच्या.... तुझ्या... "

अमृता एकदम गंभीर झाली..

कुमार ते बघून बोलेला " हे बघ, ही माझी फीलिंग आहे.. not necessary तुला पण तसेच वाटले पाहिजे... "

"
तसे नाही रे, तुझ्याबरोबर हे चार दिवस घालवल्यावर मला पण काहीसे असेच फीलिंग आले आहे "
अमृता गंभीरपणे बोलली आणि एकदम खळखळून हसली...

" I also love u my dear friend "
अमृता बोलली...

" thank god...
मला वाटले तू चिडशील "

"
नाही रे, उलट तू express केले ते बरे झाले...may be मी बोलू शकले नसते "

"
मी घरी जाऊन बोलतो घरच्यांशी... तू पण सांग... तसे दिप्ती आणि केतकीला माहिती आहे हे.. " कुमारने सांगितले

"
हम्म, एवढी लग्नाची गडबड आवरली की मी बोलते आईशी "

हळूच तिचा हात हातात घेत कुमार बोलला " लव्ह यू "

"
मी टू " तिने लाजत उत्तर दिले.

-------------------------------

सकाळी उठल्यावर केतकी उठून अमृताकडे गेली.. ती शांत झोपली होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित होते..

"
उठा मॅडम " तिच्या जवळ बसत केतकी बोलली.

"
हम्म " केतकीला बघून अमृता उठून बसली.

"
काय मग, काय बोलत बसला होता दोघे रात्री ? " केतकीने तिला विचारले.

"
तुला माहिती आहे की ? " अमृता लाजून बोलली.

"
माझी कोकी ती " तिच्या गालावर हात फिरवत केतकी बोलली

"
कोकी म्हणजे काय ? " समजून अमृता बोलली.

"
कुमार कुलकर्णी म्हणजे कोक्या... आणि तू कोक्याची कोकी "

अमृताच्या गालावर फुललेले गुलाब पाहायला कुमार खरच हवा होता तिथे....

-------------------------------------

पूर्ण लग्नाचा दिवस कुमार, अमृत दोघेही हवेत असल्यासारखे वागत होता. केतकी आणि दीप्ती त्यांना चिडवत मजा घेत होते.

दिप्तीने जाताना दोघांना जवळ बोलावून सांगितले आता योग्य वेळ बघून दोघेही घरी सांगा....

----------------------------------------
"
कुमार आणि केतकी..… अभिमान आहे आम्हाला की तुम्ही आमची मुले आहात " आई आणि बाबा कौतुकाने म्हणाले.

"
काकू, मामी आणि सगळे पाहुणे सांगत होते दोघांनी पूर्ण लग्न ओढून नेले. प्रत्येक कामात मदत केली म्हणून "

"
हो ना, कोक्यातर मनच जिंकून आलाय " केतकी कुमारकडे बघत बोलली.

"
हम्म... सगळ्यांचे मन जिंकलाय त्याने " कौतुकाने आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"
अग तसे नाही, कोक्याने कोकी शोधली आहे तिथे " केतकी आईच्या पाठीमागे लपत बोलली.

"
कोण, कोण ? जरा आम्हाला पण समजू दे " हसत आई बोलली.

"
त्याचा कॅमेरा घेऊन बघ, तुला फक्त एकीचेच फोटो दिसतील............. आपली अमू "

"
काय सांगते, अमृता... अरे वा...."

"
आई, मला आणि दिप्तीला कोकी पसंत आहे...... "

कुमार लाजून खाली बघत होता.

"
आहो, तुमचं बाळ कसे लाजतंय बघा "

----------------------------------------------

"
कुमार आणि केतकीची भरपूर मदत झाली ना ? " काकूने मामीला म्हणले.

"
हो, कुमारने बाहेरची सगळी आणि केतकीने दिप्तीची पूर्ण जबाबदारी घेतली. आणि भरपूर नम्र आहेत दोघेही. " मामी बोलेल्या.

दोघांचे कौतुक ऐकून अमृता खुश होत होती... तिच्या गालावर मस्त लाली चढली होती...

--------------------------------------------------

"
हॅलो कुमार, मी येतेय कोल्हापूरला. युनिव्हर्सिटीला काम आहे माझे. तुला वेळ येशील का माझ्या बरोबर ? "

"
किती पर्यंत पोहचशील ? मी येऊन थांबतो स्टँड वर "

-------------------------------------------------

"
या मॅडम " कुमार हसत अमृताच्या समोर गेला.

कुमारला बघून अमृता येऊन त्याला बिलगली...

"
काय काय प्लॅन आहे तुझा " गाडी सुरू करत कुमार बोलला.

"
युनिव्हर्सिटीमध्ये कॉव्होगेशन आहे आज. डिग्री मिळणार आहे. माझी इच्छा होती की तुझ्यासोबत डिग्री घ्यावी. "

"
छान, its my pleasure " कुमारने तिचा हात हातात घेत म्हणले.

कॉव्होगेशन झाल्यावर दोघे रंकाळ्याच्या बागेत येऊन बसले.

"
कुमार, आज माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. आज मला डिग्री मिळाली आणि आज घरी जाऊन मी आईशी बोलणार आहे आपल्याबद्दल... " कुमारचा हात हातात घेऊन घेऊन त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन बोलली.

"
हम्म...मी घरी बोललोय आणि माझ्या घरचे तयार आहेत... " तिच्या खांद्यावर आपला हात ठेवून बोलला.

ते दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले... संध्याकाळी कुमारने तिला गाडीत बसवले.

---------------------------------------

"
आई मला तुझ्याकडून माझ्या डिग्रीचे गिफ्ट हवंय " आईच्या गळ्यात हात टाकून अमृता बोलली.

"
बोल, काय हवंय तुला ? ड्रेस, दागिने काय हवंय ? " मामी कौतुकाने बोलल्या.

"
आई, बस ना.. "

मामीनी अमृतकडे आश्चर्यचकित नजरेने बघितले.

अमृताने मामीना हात धरून बैठकीवर बसवले आणि ती त्यांच्या पायात बसली.

"
आई, कुमार आणि केतकी कसे वाटले तुला " अमृताने विचारले.

"
चांगले आहेत की .. का ? "

"
तसे नाही, कुमार तुला जावई म्हणून कसा वाटला ? "

"
काय ? " मामी मोठ्या आवाजात बोलल्या.

"
आई, सांग ना. मला तो आवडतो "

"
अमू, खरे सांगू. मला हे मान्य नाही "

"
का पण ? " अमृताने रडवेली होऊन विचारले.

"
अमू, मला कुमारबद्दल काहींच प्रॉब्लेम नाही. पण मला त्याच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे........... 
तुला माहितीच आहे..... कुमारच्या काकांनी तुझ्या आत्याला जेंव्हा घटस्फोट दिला तेंव्हा दीप्ती फक्त 2 वर्षाची होती......  त्या वेळी, कुमारच्या बाबा आणि आईची जबाबदारी नव्हती का त्यांना समजवायची....मी आणि तुझे बाबा, किती वेळा त्यांच्याकडे गेलो होतो त्यांचा संसार सुरू राहूदे म्हणून... तुझे बाबा पण लवकर गेले तेंव्हा तर त्या दोघींची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि वय काय होते माझे सत्तावीस वर्षे... तुझी जबाबदारी पण माझ्यावर. त्या वेळी त्यांनी येऊन आत्या आणि दिप्तीची जबाबदारी घ्यायला नको होती का ? "

"
हम्म, पण कुमार तसा नाही " अमृताने वर बघत बोलले.

"
मी म्हणले ना, मला कुमारचा प्रॉब्लेम नाही............ पण मला असे वाटते की जो त्रास तुझ्या आत्याने सहन केला तो तुझ्या नशिबात येऊ नये "

"
आता तसेच परत कसे होईल "

"
हे बघ अमू... हे मला मान्य नाही.... "

"
आई पण एकदा विचार कर की "

"
अमृता, मी आयुष्यात कधीच कांही मागितले नाही तुझ्याकडे... असे समज की ही माझी इच्छा आहे की आणि अपेक्षा आहे की तू पूर्ण करशील...." म्हणून मामी उठून निघून गेल्या...

-------------------------------------

रंकाळ्याच्या बागेत कुमार आणि अमृता भेटले. अमृताने  त्याचा हात हातात घेऊन घडलेले सर्व सांगितले.. आणि म्हणाली

"
आईने माझ्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलय.. तिने एकटीने मला मोठे केलाय. माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात.......  आता तिने माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे "

"
मी कितीतरी स्वप्ने बघितली आहेत आपल्या संसाराची..... मी मनोमन तुला जोडीदार म्हणून निवडलं आहे "

"
मला पण तुझ्यासारखाच जोडीदार हवा आहे पण मी तुझी जोडीदार होऊ शकत नाही. माफ कर मला " म्हणून अमृता तेथून निघून गेली.....


लेखक,  संकुल