Sunday, July 29, 2018

निर्दोष भाग 2


निर्दोष भाग 2

लेखक - संकुल ( संतोष कुलकर्णी )

माझ्या नावाने ही कथा कोठेही छापण्यास माझी परवानगी आहे..
 


 
  
" मोरे, पासपोर्टच्या appointment साठी लोक आलेत का ?. " हेड ऑफिसवरून परत आल्यावर इन्स्पेक्टर अजिंक्य जाधवनी हेड कॉन्स्टेबल मोरेना विचारले.
" हो सर, मी लिस्ट देतो तेवीस लोक आलेत "
" मोरे, म्हणजे आज पण बारा वाजवणार तुम्ही. मला जर तुमच्या वहिनींनी घटस्फोट दिला तर मी तुम्हाला जबाबदार धरणार " हसत जाधव म्हणाले...
" होस्टेलच्या मुली आणि मुले असतील त्यांना प्रथम पाठवा"
" हो "
" नाव आणि पत्ता काय तुमचा " जाधवांनी समोरच्या मुलीकडे बघत विचारले.
" इशा दळवी "
तेवढ्यात बाहेर गोंधळ ऐकू येऊ लागला म्हणून जाधव बाहेर आले... मोरेंच्या समोर राहुल बसला होता, कपड्याना रक्त...
" पाणी प्या " मोरेंनी राहुलला पाणी दिले आणि बसायला सांगितले.
जाधव गंभीरपणे येऊन मोरेंच्या शेजारी बसले.
" बोला काय झाले ? "
" सर, माझ्या हातून एक खून झालाय "
मोरे चपापले आणि त्यांनी जाधवांकडे पाहिले.
" कोठे आणि कोणाचा " जाधवनी शांतपणे विचारले.
" तानाजी म्हस्के, जांभूळ वाडी मध्ये, मधू- मालती अपार्टमेंटच्या टेरेसवर "
" मोरे, गाडी काढा "
" पवार, ambulance ला फोन करून तिकडे यायला सांगा "
" सावंत, आत घ्या याला. पाणी, चहा काय हवे ते द्या "
तेवढ्यात फोन वाजला, जाधवांनी फोनर कानाला लावला
" ह्रल्लो, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन. इन्स्पेक्टर अजिंक्य जाधव बोलतोय. "
" सर, मी सुधाकर बर्वे बोलतोय. मधू- मालती अपार्टमेंटमधून... आमच्या अपार्टमेंटच्या टेरेसवर एक खून झालाय. खून करून खुनी राहुल देसाई पळून गेलाय "
" हो, समजले आम्हाला, येतोय आम्ही तिकडे...
 तो पर्यंत कोणाला अपार्टमेंटच्या बाहेर सोडु नाका आणि कोणाला आत घेऊ नका...
बॉडी जवळ कोणीच जाऊ नका आणि कोणतीही गोष्टीला हात लावू नका "
" हो सर "
" आलो आम्ही लगेच "
बरोबर सातव्या मिनिटाला पोलीस गाडी अपार्टमेंटच्या गेटअधून आत शिरली..
जाधव, मोरे  इतर लिफ्टच्या दिशेने धावले.
सहाव्या मजल्यावर लिफ्टचे दार उघडून जाधव बाहेर आहे...
" सर, मी सुधाकर बर्वे, मीच तुम्हाला फोन केला होता. तिकडे आहे बॉडी. " म्हणत बर्वे जाधवना घेऊन टेरेसवर गेले...
मोरेंनी पुढे जाऊन नाडी तपासली आणि जाधवांकडे बघून नाही अशी खूण केली.
" outline काढून घ्या आणि बॉडी पोस्मार्टिम साठी पाठवा "
" कोणी बघितला खून होताना "
" नाही सर, पण मुले इथे खेळत होती.... एकदम समोरच्या बिल्डिंग मधला राहुल देसाई पळत आला, त्याच्या अंगावर रक्त लागले होते... त्याला बघून मुले पळत घरी आली. आम्ही यायच्या आत, तो पळून गेला गाडी घेऊन "
"हम्म, तो पोलिस स्टेशनला हजर झालाय आणि त्याने गुन्ह्याची कबुली पण दिली आहे "
जाधवांनी पुढे जाऊन बॉडी तपासली आणि काही मारामारी वगैरेचे पुरावे मिळतात का चेक केले....
" इथे CC TV नाहीत "
" नाही, इथे टेरेसवर नाही... आमचा CC TV फक्त गेटवर आणि पार्किंग मध्ये आहे. "
" एवढी मोठी अपार्टमेंट असून फक्त खालीच CC TV... आता वर आणि जिन्यात cc tv असता तर काय झाले ते समजले असते " बर्वेवर चिडत जाधव बोलले... " मोरे,  CCTV चे 5 वाजल्यापासूनचे फुटेजची कॉपी बनवून घेऊन या . "
" बर्वे, मला राहुल आणि तानाजीची माहिती द्या "
" राहुल असे कसे वागला तेच कळत नाही. खूप चांगला मुलगा आहे तो आणि सगळ्यांशी मिळून मिसळून असतो..
आणि हा तानाजी पण इथे दोन आठवड्यापूर्वी राहायला आलाय.. mpsc चा अभ्यास करत होता.
तसा या दोघांचा काहीच संबंध नव्हता.... दोघांची तोंड ओळख पण नव्हती... "
" मग, असे काय झाले की राहुलने तानाजीचा खून करावा " जाधव स्वतःशीच बोलत होते.
जाधव आणि टीमने खाली जाऊन दुकानात, मेसमध्ये वगैरे चौकशी केली पण हातात काहीच आले नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पोलिस स्टेशनला आल्यावर, जाधवांनी राहुलला घेऊन यायला सांगितले.
" ये राहुल बस, पाणी हवंय ? "
" नाही " राहुल बोलला.
" आता मला सांग, नक्की काय झाले ? तू का त्याचा खून केला ? "
" सर, मीच मारलंय तानाजीला "
" हो, पण का ? "
" तो पैसे मागत होता उधार, दहा हजार. मी नाही म्हणाले त्याला तर तो चाकू घेऊन मला मारायला आला.. मग, मी त्याचा चाकू घेऊन त्यालाच मारले.... "
" पण दोघे एकमेकांना ओळखत पण नव्हता असे सगळे सांगत आहेत... "
" हो, पण त्याने मला फोन करून पैसे मागितले आणि समोरच्या बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले..... मी नाही म्हणाले तर चाकू घेऊन मारायला धावला.. आमच्यात झटपट झाली, त्यात मी त्याचा चाकू घेऊन त्याला मारले... आणि पळून इकडे आलो.."
" अरे, तो धमकी देत होता तर तक्रार करायचीना पोलिसात "
" त्याने संधीच दिली नाही "
" ठीक आहे, मोरे, घेऊन जा याला "
थोड्या वेळात, " मोरे, काय वाटतंय तुम्हाला ? "
" नाही साहेब, मला नाही वाटत याने खून केला असेल. काहीतरी लपवतोय हा "
" एक काम करा, चार्जशीट दाखल करा. बघू पुढचं पुढे "
" ठीक आहे सर " म्हणत मोरे सॅल्युट ठोकून तिथून निघाले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" श्रवण, मी पूर्णपणे फसलोय यात. "
" हम्म, सध्या तरी. मी जाधवांशी बोलतो. कोर्टातून पंधरा दिवसांचा रिमांड घ्या म्हणून.
आणि आत्ताच प्रियांकाबद्दल कांहीं बोलू नको. ती सावध होईल. अजून तिच्याबद्दल पुरावे गोळा करावे लागतील.
सध्या असलेल्या पुराव्यांवरून एवढे सिद्ध करता येईल की ती तुला फसवत होती. पण खून केला हे नाही "
" ठीक आहे, तू सांगशील तसाच वागेन मी "
" तिची आणि तुझी भेट नाही होणार हे पण बघतो मी. आणि मी आहे, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुला कांही पण लक्षात आले तर मला सांग "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" इन्स्पेक्टर साहेब, आत येऊ का ? " श्रवणने इन्स्पेक्टर अजिंक्य जाधवच्या केबिनच्या दरवाज्यातून विचारले.
" xxxx, तू कधी पासून इतका सज्जन झाला रे ? " जाधवांनी त्याला बघून हसून म्हणले.
" साल्या, तुझ्या पोलिस स्टेशनमध्ये आहे. On duty पोलिस ऑफिसरला शिव्या घातल्या म्हणून आत घेशील आणि थर्ड डिग्री लावशील. काही नेम नाही तुझा. "
" बस, काय काम काढलेस ? "
" अरे, राहुलची केस माझ्याकडे आहे "
" पुअर गाय, असे का वागला हे नाही समजत "
" सांगतो " म्हणत श्रवनने जाधवना पूर्ण घटनाक्रम सांगितला.
" असं आहे तर, बोल पुढचा प्लॅन काय तुझा ? "
" आत्ता तर पंधरा दिवसाचा रिमांड घे म्हणजे मला थोडा वेळ मिळेल आणि त्या प्रियंकाला भेटायला देऊ नको राहुलला. धमकी किंवा ब्लॅकमेल करू शकते ती "
" तो पर्यंत, मी तिचे आणि तानाजीचे काय रिलेशन आहे ते बघतो "
" ठीक आहे. मला जमेल तसे बघतो "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी अकरा वाजता, न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर केसचे हिअरिंग सुरू झाले.
सरकारी तर्फ ऍड. साळुंखे उभे राहिले...
" युअर ऑनर, ही केस म्हणजे माणुसकीस काळिंबा आहे.
एक mpsc चा अभ्यास करणारा होतकरू तरुण तानाजी म्हस्के यांचा आरोपी राहुल देसाई याने निघृण पणे खून केला आणि स्वतःबद्दल सहानभूती मिळावी म्हणून तो पोलिस स्टेशनला हजर झाला..
हे कृत्य त्याने शांतपणे आणि विचारपूर्वक केलेले असून माझ्या ह्या विधानास पोलिस आणि त्या बिल्डिंग मधील रहिवासी नक्कीच दुजोरा देतील असा मला विश्वास आहे.
माझी आपणास विनंती आहे की आपण आरोपीस सक्त शिक्षा सुनावून असल्या कृत्याना आळा घालावा "
" युअर ऑनर,  मी माझे मित्र साळुंखे यांच्या विधानाशी सहमत नाही
मी हे मान्य करतो की राहुल देसाई हा स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला असून त्याने खुनाचे स्टेटमेंटपण दिले आहे.
पण ह्या झालेल्या खुनामागील मोटिव्ह  तसेच कोणत्या परिस्थिती मध्ये हा खून झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण या केसची सुनावणी पंधरा दिवस पुढे ढकलावी "
" पोलिसांच काय मत आहे यावर " न्या. चंद्रचूडनी विचारले.
" युअर ऑनर, आमचे पण हेच म्हणणे आहे. आम्हाला राहुलचा पंधरा दिवसांचा रिमांड हवा आहे. या वेळेत आम्हाला त्याच्याकडून खुनाचा मोटिव्ह आणि काही परिस्थितीजन्य पुरावे गोळा करता येतील. "
" ठीक आहे. पंधरा दिवसांचा रिमांड मंजूर करण्यात येत आहे.. "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या रात्री श्रवनच्या घरी, श्रवण, सई,  सोहम, सुलतान आणि अजिंक्य जाधव आणि शिवास रिगल यांची मीटिंग भरली.
सई आणि सोहम त्यांचा आवडता अँपल जुस घेऊन आणि इतर सर्व शिवास रिगल ऑन रॉक्स घेऊन बसले होते. समोर चीझ, खारावलेले काजू वैगरे साहित्य होते.
" जिंक्स, आत्ता आपल्याकडे इतके पुरावे नाहीत की आपण लगेच प्रियंकाला हात लावू शकतो ,आणि तिच्या पाळतीवर राहिले पाहिजे नाहीतर ती गायब होऊ शकते"
" हम्म, मी माझे कांही माणसे तिच्या मागे लावून ठेवतो " तिची पूर्णवेळेची खबर आपल्याला मिळत राहील "
" गुड...
 सोहम, तू तिचे कोणाकोणाला कॉल होतात,
 तिच्याकडे किती हँडसेट आहेत त्या सर्वांचे IMEI नंबर, तिचे चालू असलेले फोन नंबर, बँक अकाउंट्स, क्रेडिट कार्ड्स,  तिची सध्या सुरू असलेली अफेअर.... सगळी माहिती काढ.
May be आपल्याला तिचे बँक आणि क्रेडिट कार्ड्स ब्लॉक करावे लागतील, त्याची पण तयारी ठेव "
" अरे, मी पोलिस आहे रे, माझ्या समोर तरी असले सायबर crime ची भाषा करू नका राव "
या वाक्यावर सगळे हसले...
" सुलतान, तू तुझी थोडी माणसे लावून तानाजी आणि प्रियांका उर्फ सुकन्याबद्दल बद्दल माहिती काढ "
" जिंक्स,  उद्या आपल्याला मर्डर स्पॉटवर जावे लागेल. बघू काही पुरावे मिळतात का आपल्याला... "
" ठीक आहे "
" PM चे रिपोर्ट आले का काही ? "
" उद्या येतील न्यातीकडून. बोललोय तिला तुझी केस आहे म्हणून "
" छान "
" छान काय, डोक्याला हात लावला तिने "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी बरोबर नऊ वाजता, अजिंक्य आणि श्रवण डॉ. न्यातीच्या केबिनमध्ये होते.
"चाकूचे पाठीवर तीन वार आहेत, त्यातील एक वार हा डाव्या बरगडीमध्ये केला, त्याच्या मुळे लिव्हरला धक्का लागून हा मरण पावला.....  "
" गुड कॅच "
" वार करणारा व्यक्ती हा कमीत कमी साडे सहा फूट उंच आहे कारण झालेला वार हा जमिनीपासून साडे चार फूट उंचावर आहे.... "
" श्रवण, याचा अर्थ असा आहे की, प्रियांकसोबत कोणीतरी होते तिथे "
" जिंक्स, मला वाटतंय, प्रियांका जेंव्हा ती गरोदर आहे आणि ते बाळ राहुलचे आहे हे सांगत असणार त्या वेळी कोणीतरी त्यांचे शूटिंग करत असणार... जे दाखवून ते नंतर राहुलला ब्लॅकमेल करू शकतात. जेंव्हा राहुल खाली गेला त्या वेळी तानाजी टेरेसवर पोहचला आणि प्रियांका आणि तिच्या साथीदारकडुन त्याचा खून झाला.. "
" बरोबर आहे, मी पूर्ण महिन्याच्या CCTV फुटेज मागवून घेतो. म्हणजे बिल्डिंमध्ये कोणी कोणी आलंय हे बघता येईल "
" हम्म, राहुलला घेऊन मर्डर स्पॉटवर जात येईल का ? " श्रवनने विचारले
" जशी आज्ञा " हसत अजिंक्य बोलला...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" राहुल, तू आणि प्रियांका जेंव्हा बोलत होता तेंव्हा कोण कोठल्या दिशेला होते ?....
 असे समज की मोरे हे प्रियांका आहेत..."
" प्रियांका इथे भिंतीला टेकून उभी होती... " मोरेना भिंतीजवळ उभे करत राहुल बोलला  " आणि मी इथे उभा होतो "
" तेथेच थांब " श्रवण बोलला आणि तो चालत राहुलच्या मागे येऊन उभा राहिला आणि तेथून समोर बघितले तर त्याला पाण्याची टाकी दिसली.
" अजिंक्य, तिथे पाण्याच्या टाक्याच्या जवळ बघू.. "
तिथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या होत्या... आणि त्या दोन टाक्याच्या मध्ये दोन इंचाची गॅप होती.. त्या टाक्यांच्या मागे एक माणूस उभा राहील इतकी जागा होती. ती जागा राहुल उभा होता तेथून सहा फुटावर होती.
 तिथे बसून त्यांचे बोलणे रेकॉर्ड करणे शक्य होते आणि पाण्याच्या टाक्या असल्यामुळे तिथे लाईट पण नव्हता... संध्याकाळच्या अंधारात तिथे कोणी बसला तर समोरून दिसणे शक्य नव्हते..
अजिंक्यने तेथे जाऊन बघितले, तर तेथील मातीमध्ये कोणीतरी बसले असल्याच्या खुणा होत्या... खाली बुटाचे छाप होते आणि त्याला तिथे एक गुटख्याचे फोडलेले पाकीट मिळाले...
फोटोग्राफर ला बोलावून त्याने तेथील बुटाचे छापचे फोटो घ्यायला सांगितले... आणि ते पाकीट चिमट्याने उचलून पुराव्यांच्या पिशवीत टाकले..
" मोरे, सेक्रेटरीना बोलवा "
 सेक्रेटरी तिथे आले... "आम्हाला तुमचे CCTV फुटेज कॉपी करून घ्या जेवढे आहे तेवढे "
" ठीक आहे सर "
" मोरे, तुम्ही थांबून CCTV फुटजची कॉपी घेऊन या "
" येस सर "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" दादा एकदा केसच्या मागे लागला की तहान भूक विसरून जातो ना " सोहमने सईला विचारले..
" बघ ना, किती वेळ गेलाय. मी आपली वाट बघत बसली आहे जेवायला "
" म्हणूनच सांगतोय तुला, दादाच्या मागे लागू नको... नंतर पस्तावशील... "
" चल.... "
" हा हा... काय एक माणूस लाजतंय तरी "
" सोहम,  तू पण ना "
" तुमच्या लग्नाचा साक्षीदार... दादाकडून करवला म्हणून उभा राहणार.... आणि तुझ्या भाऊ म्हणून दादाचे कानपण पिळणार.....   पण दोन्ही घरचा पाहुणा म्हणून मला उपाशी ठेवू नका... "
" कोण उपाशी आहे " श्रवनने आत येत विचारले.
" कोणी नाही " सईने पटकन उत्तर दिले..
" आत्ता तर म्हणत होती की, धनी कधी येणार... भरपूर भूक लागली आहे...धनी आल्या बिगर एक घास पण जायचा नाही मला "
" असं... माफ करा कारभारीण बाई. या पुढे अशी आगळीक नाही होणार.." श्रवण मिश्कीलपणे हसत बोलला...
" तुम्ही दोघे म्हणजे अती आहेत... जेवण वाढते मी "
" तुम्ही जेवून घ्या, उगीच कबाब मध्ये हड्डी कशाला.. " म्हणून लॅपटॉप घेऊन सोहम आत निघून गेला.
" जेवून घायचे ना. कशाला वाट बघत बसलीस. हे घे " म्हणत श्रवनने एक घास सईला भरवला..
" लग्न होईपर्यंत तरी धीर धरा... " आतून सोहम बोलला..
दोघेही खळखळून हसले...
जेवण झाल्यावर श्रवण, सई, सुलतान आणि सोहम तिघेही ऑफिसमध्ये आले...
" कांही नवीन माहिती ? " श्रवनने सोहमला विचारले.
" तिच्याकडे सध्या तीन फोन आहेत...
samsung galaxy 8,
 iphone 6plus
vivo v7
यातील samsung आणि iphone ती नेहमी वापरते.. आणि vivo हा तिचा पर्सनल नंबर आहे. या नंबरवर फक्त तिच्या घरचे आणि गावाकडील फोन येतात..
तानाजी हा तिच्या गावाकडील असल्यामुळे त्याचा फोनपण तिच्या ह्याच पर्सनल नंबरवर यायचा... तो कधीतरी फोन करायचा...  फोन हे फक्त एक दोन मिनिटे चालायचे... "
" मला वाटते, तानाजी mpsc च्या अभ्यासासाठी पुण्याला आला असेल आणि इथे रूमवर राहायला आल्यावर त्याला प्रियांका दिसली असेल...
तिचे नवीन नाव आणि नवीन रूप दिसल्यामुळे त्याने तिला जाब विचारला असेल...
आणि तो घरी सांगेल म्हणून तिने त्याचा काटा काढला " सईने शक्यता व्यक्त केली...
" बरोबर, असेच झाले असेल "
" सई, तू तिला फोन कर आणि तिचे ऍड फिल्म साठी selection झालय...... आणि दोन चार दिवसात update देते म्हणून सांग....
 चार पाच ऍड आहेत आणि एखादी सिरीयल किंवा फिल्म पण मिळेल आणि चांगले पैसे मिळतील म्हणून सांग "
" त्याने काय होईल ? "
" ती निदान पळून गेली तरी सई च्या संपर्कात राहील "
" सोहम, खुनाच्या वेळेच्या आधी तीन तास प्रियंकाला कोणाचा फोन आले होते ती पण लिस्ट काढ "
" ठीक आहे "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" या काका, मी आहे राहुलबरोबर... तुम्ही काळजी करू नका " श्रवण समोर बसलेल्या गजाननरावना म्हणाला.
" तुमच्या विश्वासा वर तर आहे आम्ही... तुमचा लहान भाऊ म्हणून सोडवा राहुलला यातून "
" नक्की काका ? "
" कांही पैसे.... ? "
" राहुल यातून सुटला की मग सांगेन मी "
गजाननरावांच्या डोळ्यातून पाणी ओघळले..
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" सुलतान, त्या वेळच्या CCTV फुटेजची कॉपी आणली आहे अजिंक्यकडून ती बघूया चल... "
" हा राहुल आला बाहेरहून....
१५ मिनिटात, तो बाहेर गेला....
तानाजी आत येताना दिसत आहे...
२० मिनिटांनी तो परत आला, हातात मिठाईचा बॉक्स आहे. म्हणजे तो खरे बोलतोय...
याचा अर्थ खून हा प्रियांका आणि त्या लपून बसलेल्या व्यक्तीनेच केला आहे... "
" हम्म " श्रवण उद्गारला
" CCTV मध्ये बाहेरचे कोणीही दिसत नाही आणि खून हा दोन व्यक्तींनी केला आहे याचा अर्थ दुसरा व्यक्ती हा त्या बिल्डिंग मधीलच आहे "
" सुलतान, एक काम कर, तुझ्या माणसाला मतदार  यादी घेऊन त्या बिल्डिंग मध्ये पाठव आणि सर्व व्यक्तीकडून मतदार यादी update करून घे आणि प्रत्येक व्यक्तीची सही घ्यायला सांग...
सही घेताना त्याला लक्ष ठेवायला सांग की कितीजण डाव्या हाताने सही करतात...
त्यात कितीजण एक सहा, साडे सहा फूट उंच आहेत...
आणि कोणी खुनाच्या दिवसापासून बाहेरगावी गेला आहे का ? "
" हो लावतो मी माणसे कामाला "
" हे काम तीन दिवसात झाले पाहिजे. कोर्टात जाण्याच्या आधी मला ही लिस्ट हवी आहे "
" हो... "
" आणखी, सुलतान, तू थोडे त्या एरिया मधील टपरीवर फिर आणि RM गुटखा कोठे मिळतो ते बघ...
आणि एकदा ती टपरी कळली की मग या बिल्डिंग मधून कोण ते विकत घेतो ते बघ... "
" चला लागा कामाला "
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: 


 

लेखक - संकुल ( संतोष कुलकर्णी )
माझ्या नावाने ही कथा कोठेही छापण्यास माझी परवानगी आहे..
 

No comments:

Post a Comment